Singhania IBDP

Ekadashi Festival

Jul 16, 2024
" अवघे गरजे पंढरपूर " आज श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेत 'आषाढी एकादशीचा ' सोहळा साजरा झाला. विद्यालयाच्या प्राचार्य - डॉक्टर श्रीमती रेवती श्रीनिवासन यांनी दीप प्रज्वलन केले. विठ्ठलाची आरती छोट्या वारकऱ्यांनी विठ्ठलाच्या जयघोष करत , पालखी सोहळा संपूर्ण शाळेत साकारला. विद्यालयाचे प्रशासक, विद्यार्थी, सर्व गुरुवर्य कर्मचारी वर्गाने विठू माऊलीचा हा सोहळा 'याची देही याची डोळा ' अनुभवला विद्यार्थ्यांना सांस्कृतिक परंपरा जपणूक करणे.आपल्या वारकरी संप्रदायाची महान गाथा त्यांच्या मनात रुजवणे,आपल्या या अध्यात्मिक संस्कृतीची पालखी त्यांच्या हाती देत निरपेक्ष, निष्काम भक्ती मनात रुजवणे हा या सोहळ्याचा उद्देश आहे.शालेय अभ्यासक्रमातील वारकरी संप्रदाय विद्यार्थ्यांनी आज स्वतः साकारला .अशा विठ्ठल माऊलीच्या गजराने आज सर्व शाळा भक्तीरसात चिंब भिजली.
ANNOUNCEMENTS
ANNOUNCEMENTS
  • No Announcements.